Thursday, June 16, 2011

शब्दजन्मांच्या सुरस कथा

आंतरभारतीय
सुजय शास्त्री मुख्य उपसंपादक/ दिव्य मराठी
[ भास्कर समूह का मराठी मराठी अखबार दैनिक दिव्य मराठी महाराष्ट्र में लांच हो चुका है। प्रसिद्ध पत्रकार कुमार केतकर इसके प्रधान संपादक हैं। मेरा सौभाग्य कि राजेन्द्र माथुर, एसपी सिंह जैसे ख्यात संपादकों के साथ काम करने के बाद अब मुझे मराठी के सबसे बड़े नाम कुमारजी के साथ काम करने का मौका मिला है। शब्दों का सफर को कुमार जी ने भी सराहा है। दिव्य मराठी के रविवारीय परिशिष्ट रसिक में उन्होंने इस प्रयास के बारे में खासतौर पर एक आलेख प्रकासित किया। मूल मराठी आलेख सफ़र के पाठकों के लिए यहां पेश है। ]
का गज’ हा शब्द अनेकांना फारसी, उर्दू कुलातील वाटतो. पण त्याचे मूळ आहे ते चिनी भाषेतले. पोर्तुगीज पाणी भरण्याच्या भांड्याला ‘बाल्डे’ म्हणत. बंगाली भाषेने ‘बाल्डे’ला ‘बालटी’ म्हणून आपल्यात सामावून घेतले .नंतर हिंदीने ‘बालटी’ शब्द आहे तसा उचलला. हिंदी भाषक पत्रकार अजित वडनेरकर अशाच शब्द व्युत्पत्तींच्या शोधात गेली २५ वर्षे प्रवास करत आहेत...
राठीत ‘बादली’ हा शब्द आला तो हिंदीतील ‘बालटी’ या शब्दांतून. पण हिंदीत तो कसा आला? १६व्या शतकात पोर्तुगीज वसाहती बंगालमध्ये वसल्यानंतर ते पाणी भरण्याच्या भांड्याला ‘बाल्डे’ असे म्हणत. त्या काळात बंगाली भाषेने ‘बाल्डे’ला ‘बालटी’ म्हणून आपल्यात सामावून घेतले आणि नंतर हिंदीने ‘बालटी’ शब्द आहे तसा उचलला. अशीच कथा आहे महाभारतातील व्यक्तिरेखा अर्जुनाची आणि दक्षिण अमेरिकेतील देश अर्जेटिना यांच्यातील नामसाधर्म्याची. संस्कृतमध्ये चांदीला ‘रजत’ म्हणतात. तर प्राचीन इराणी अवेस्ता भाषेत त्याला ‘अर्जत’ म्हणतात. ग्रीक भाषेत चांदीला ‘अर्जाेस’, ‘अर्जुरोस’ व ‘अर्जुरोन’ म्हणतात. संस्कृतमध्ये ‘अर्जुन’ म्हणजे चमचमणारा. लॅटिनमध्ये ‘अर्जेंटम’ या शब्दाचा अर्थ चांदी आहे. १५व्या शतकात द. अमेरिकेत चांदीच्या खाणींचा शोध लागला, तेव्हा त्यावरून ‘अर्जेंटिना’ हे एका देशाचे नाव पडले. शब्द व्युत्पत्ती ही संस्कृत भाषेची परंपरा आहे. मराठीमध्ये कृ. पां. कुलकर्णी यांनी मराठी व्युत्पत्ती कोश संपादित केला आहे. शब्दांच्या जन्माच्या शोधात अनेक मनोरंजक सफरी घडतात. या प्रवासात भाषांवर झालेले संस्करण, त्यावर निसर्गासह राजकीय आक्रमणे, धार्मिक चालीरिती, रिवाज यांचा पडलेला प्रभाव आढळून येतो. अनेकदा आपण आपल्याच भाषेतला शब्द वेगळ्याच भाषेतून आल्याचे लक्षात येताच चकित होतो. मग शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी वाचायला गेले, की हजारो वर्षांचा इतिहास डोळ्यांसमोर उलगडत जातो. हिंदी पत्रकार अजित वडनेरकर अशाच शब्द व्युत्पतींच्या शोधात गेली २५ वर्षे प्रवास करत आहेत. ‘ऋषीचे कूळ आणि शब्दांचे मूळ शोधू नये’ असे म्हणतात. पण वडनेरकरांनी याकडे साफ दुर्लक्ष करत १० ग्रंथांपैकी पहिला ग्रंथ ‘शब्दों का सफर’ या नावाने प्रसिद्ध केला आहे.
5 june rasikया ग्रंथात वडनेरकर पूर्व भारतातील भाषांपासून पश्चिम युरोपीय देशामधील भाषांचा वेध घेतात. हा वेध घेता-घेता त्यांनी काही वेळा सेमेटिक (प. आशिया आणि उ. आफ्रिकेतील) भाषांच्या खिडक्या किलकिल्या केल्या आहेत. तर गरज पडल्यावर चिनी भाषेतही डोकावून पाहिले आहे. पण वाचकांसमोर शब्दांची उत्पत्ती मांडताना त्यांनी कोणतीही कसूर ठेवलेली नाही. एकीकडे वाचकांची जिज्ञासा शमवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण त्याचबरोबर चाणाक्ष वाचकाला इतिहासाची शिदोरीही ते देतात. प्राचीन काळापासून व्यापाराच्या निमित्ताने विभिन्न देशांदरम्यान वस्तूंचे जेवढे आदान-प्रदान झालेले आहे, त्याच्या कित्येक पट शब्दांचा व्यापार झालेला आहे. व्यापाराच्या निमित्ताने हजारो ज्ञात-अज्ञात व्यापारी, फिरस्ते, दर्यावर्दींनी जगातील अनेक प्रदेश, भाषिक समूहांशी संपर्क साधला. या संपर्कातून त्यांनी आपली भाषा, संस्कृती, चालीरिती देऊ केल्या. अशा अनेक मुसाफिरांना लोक विसरले पण त्यांनी देऊ केलेली भाषा, शब्द मात्र तसेच राहिले. काही शब्द जेते-जिते संबंधांतून लादले गेले तर काही शब्द सहजपणे परक्या भाषेत सामावले गेले. शब्दांचा हा व्यापार आजच्या आधुनिक युगातही तसाच सुरू आहे. अजित वडनेरकर शब्दांच्या प्रवासाचा मोठा ऐतिहासिक दस्तावेज डोळ्यांसमोर उभा करतात. अगदी नेहमीचा हिंदी शब्द ‘कागज’ची व्युत्पत्ती ते अत्यंत मनोरंजकपणे आणि प्रसंगी धक्का देत सांगतात. ‘कागज’ हा शब्द अनेकांना फारसी, उर्दू कुलातील वाटतो. पण त्याचे मूळ आहे ते चिनी भाषेतले. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात कागदाचा शोध चीनमध्ये लागला. कागदाला चिनी भाषेत ‘गू-झी’ व ‘कोग-द्ज’ असे दोन शब्द सापडतात. कागद निर्मितीचे तंत्रज्ञान गुप्त ठेवल्याने त्याची माहिती कित्येक शतके उर्वरित जगाला नव्हती. पण सातव्या-आठव्या शतकात उजबेकिस्तानमध्ये ‘कोग-द्ज’ हा शब्द तुर्कीत ‘काघिद’ म्हणून पोहोचला. नंतर अरबी, फारसी व उर्दूत तो ‘कागज’ झाला. भारतात मराठी, राजस्थानीत तो ‘कागद’, तर तामिळमध्ये ‘कागिदम्’, मल्याळममध्ये ‘कायितम्’ व कन्नडमध्ये ‘कायिता’ असा झाला.
‘शब्दों का सफर’ हा एका अर्थी विश्वकोश लेखनाच्या जवळ जाणारा ग्रंथ वाटतो. कारण या ग्रंथात प्रत्येक शब्द ‘प्रिझम’मधून पाहिल्यासारखा भासतो. शब्दाचा इतिहास, त्याचा देश, त्याची जातसंस्कृती, सामाजिकता, राजकीय इतिहास यांना स्पर्श करणारा हा व्यापक संग्रह आहे. अजित वडनेरकर मध्य प्रदेशचे असले तरी त्यांचे मूळ मराठी आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील सिहोर येथे झाला. आजोबा पं. लक्ष्मणराव बुधकर व आई विजया वडनेरकर यांच्या प्रभावामुळे ते साहित्याकडे वळले. हिंदी साहित्यात एम.ए. करताना त्यांचा हिंदीतील श्रेष्ठ साहित्यिक व भाषातज्ज्ञ डॉ. सुरेश वर्मा यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या मौल्यवान शिकवणुकीतून हा ग्रंथ साकार झाला आहे. आजूबाजूचे वातावरण हिंदी असले तरी त्यांच्या लिखाणात मराठीत सापडणारा विनोद आहे. या विनोदाच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत रुक्ष वाटणाºया शब्दांचे कुळ अगदी सहजतेपणाने, सोप्या भाषेत, नर्म विनोदी शैलीत मांडले आहे. शब्दांची व्युत्पत्ती सांगण्याच्या ओघात ते ‘शाब्बाश’ या शब्दाचे कूळ इराणचा बादशहा ‘शाह अब्बास’ असे सांगतात तेव्हा हसू येते. तसेच ‘पायजमा’ हा शब्द शक राज्यकर्त्यांची देणगी आहे हे वाचल्यावर धक्का बसतो. तर ‘कमीज’ या शब्दाच्या मागे धावताना ते आपल्याला अरबस्तानातून ग्रीस, अल्बानिया, इजिप्त, नेपाळ, इंडोनेशिया, फ्रान्स, इंग्लंड अशा देशांची सफर घडवून आणतात. देश-विदेशाची सफर, त्यांचा इतिहास, रितीरिवाज, लोकसंस्कृती हे या ग्रंथाचे विशेष आहेत, पण शब्दाला सीमेची, संस्कृतीची, भाषेची बंधने नसतात हे ते ठासून सांगतात. शब्दांची सत्ता ही राजकीय सत्तेपेक्षा मोठी आहे. भाषेच्या शुद्धीकरणाच्या नावाखाली किंवा परकीय भाषेच्या आक्रमणाच्या नावाने गळा काढणाºया अनेकांना ते शब्दाचे सामर्थ्य सांगतात. भाषेमुळेच विविध मानवी समूहांमध्ये न तुटणारे संबंध निर्माण झाले आहेत, हे या ग्रंथामुळे लक्षात येते. 
ये सफर आपको कैसा लगा ? पसंद आया हो तो यहां क्लिक करें

4 कमेंट्स:

देवेन्द्र पाण्डेय said...

मराठी कम समझता हूँ लेकिन समझता हूँ। संक्षिप्त में संपूर्ण आलेख है।
इसका हिंदी अनुवाद भी देते तो पूरा समझ में आ जाता ।

shama said...

फार छान ! अभिनन्दन! पुण्यात आल्यास अवश्य भेटा!

प्रवीण पाण्डेय said...

बहुत ही सुन्दर, बधाई हो।

शरद कोकास said...

कुमार केतकरांचा हा लेख अजित वडनेरकरांच्या समुद्र सारख्या साहित्यातून बालटी किंवा बकेट एवढ़ पाणी काढ़ून त्याची चव सांगण्या सारखा आहे । मराठीत सुद्धा तुम्हाला यश मिळो ही शुभेच्छा - शरद कोकास

नीचे दिया गया बक्सा प्रयोग करें हिन्दी में टाइप करने के लिए

Post a Comment


Blog Widget by LinkWithin